"बाळूमामांच्या नावाने चांगभलं.."
'अभिनव योगी देवावतारी संत !'
विविध समाज घटकांमध्ये अनेक असाधारण संत होऊन गेले. संत कनकदास व मुगुळखोडचे ता.रायबाग, जिल्हा बेळगाव येथील यल्लालिंग महाप्रभू हे धनगर समाजात जन्मले आणि विशेष म्हणजे अत्यंत कष्टमय आणि खडतर जीवनक्रम जगणाऱ्या या समाज घटकामध्ये बाळूमामांच्या रुपात देवावताराने जन्म घेतला. कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या चिक्कोडी तालुक्यातील आक्कोळ गावी सोमवार अश्विन शुद्ध व्दादशी शके १९१८ दि.०३, ऑक्टोबर १८९२ साली दुपारी ४ वाजून तेवीस मिनिटांनी शंकर भगवान स्वत: आपल्या अचिंत्य मायेचा स्वीकार करून एका धनगर कुटुंबात बालक म्हणून अवतीर्ण झाले!
पावसाळा संपत आलेला होता. छान ऊन्हे पडलेले असता, सृष्टी देवता सुंदर हिरवा शालू नेसून हसत होती. बळीराजाच्या कष्टाचं सोनं झालं होत ! सीमोलंघन साजरा करून नवान्न पौर्णिमेस भूमातेची पूजा करण्यासाठी बळीराजा आतुर झाला होता, त्यावेळी लाखो लोकांच्या जीवनातील दु:खाचा अंधार दूर करून त्यांना सुखाचार, संसार नि आनंदाचा भक्तिमार्ग दाखवणारा महात्मा प्रकट झाला होता !
मायाप्पा एक सत्यशील धनगर होता व त्याची पत्नी सुंदरा मोठी सुशील आणि भाविक होती. ती विठ्ठल उपासक होती. बालपणी बाळूमामांना कोणी अवतारी म्हणुन ओळखले नाही. एकांतात दीर्घकाळ राहणे, बाबळीच्या काट्यावर विश्रांती घेणे, अव्दैेतअवस्थारूप समाधीत तासनतास रमणे, सांकेतिक भाषेत सूचक बोलणे, वगैेरे त्यांचे प्रकार सामान्यांना अनाकलनीय होते. महापुरुषांना पुण्यवंत प्रेमळ भक्तमंडळीच ओळखू शकते.
बाळूमामांनी बालपणात एका शेठजीच्या घरी नोकरी केली. नंतरच्या काळात त्यांचे बहिणीच्या सासरी कामावर राहणे, यात काही दिवस गेले. बहिणीच्या घरी असतानाच तिच्या सत्यव्वा नावाच्या कन्येशी मामाचा विवाह करण्यात आला. बळे - बळेच आणि अनिच्छेने पडलेली जबाबदारी स्वीकारून बाळूमामा स्वतंत्रपणे धनगरांचा मेंढपाळीचा व्यवसाय करू लागले .
'मामांची बकऱ्यांची सेवा'
मामांनी धनगरी आयुष्याचा स्वीकार केला. इथे श्रमाला ना अंत ना पार असतो. हे तर हाल आपेष्टांचेच माहेर! शेळ्या मेंढ्याचा कळप सांभाळणे सोपे नसते. ऊन, पाऊस, थंडी, वारा इथे नाही सुखाला थारा. जित्राबांना पाणी-चारा, तिथे सुखाचा घास बरा; भ्रमंती हाच आपणा निवारा. मामांची अशी हि जीवनधारा! बकऱ्याना होणाऱ्या रोगराईला, अनेक साथीनं तोंड द्यावे लागते. अशावेळी असे म्हणावे वाटते...
जरी एक पडे आजारी | मामा होती धन्वंतरी ||
आणि मामा बकऱ्यांना रोगमुक्त करी ||
बकरी चरत पोटभरी | मामा शमती उदारी ||
ती नाचता धरणीवरी | नाचती मामा ||
(बाळूमामा वि.ग्र. २५-६०)
पशुपक्षी चारा खाता | मामाशी होय तृप्तता ||
हे त्यांचा जीवनाचे मर्म होते. चारा टंचाईला आणि अनंत प्रकारच्या स्वभावांच्या माणसांशी जुळवून जगावे लागते.
जर चुकून एखादी बकरी जव पिके खाई | धनी खरपूस शिवी देई |
ती निवांत ऐकुन घेई | प्रपंचालागी ||
(बाळूमामा वि.ग्र. ३-२३)
समाजात शून्य प्रतिष्ठा असलेली विलक्षण जीवपध्दती स्वीकारूनही बळूमामांनी जगाकडे कसलीही याचना न करताही नीती, भक्ती, बंधुभाव, धर्म-प्रभावनेचा प्रसार करण्यासाठी केलेले कार्य पाहता मन थक्क होते.
मामांचीया सेवेपारी | राखावी तयांची बकरी ||
ही भावना बाळगून असंख्य भक्त बकऱ्यांच्या कळपात येत असतात. कमीत कमी सव्वा महिन्याची सेवा स्वीकारली जाते. बकऱ्यांच्या कळपातील प्रमुख जी जी आज्ञा देतील, जी कामे सांगतील ती विनातक्रार करावी लागतात. हि सेवा करताना; प्रामाणिकपणा, चिकाटी, कोणतेही काम करण्याची मनाची तयारी असावी लागते. करडु पाजणे, दुध काढणे, बकरी-शेळ्यांना औषधोपचार करणे, बकऱ्यांसाठी जाळे लावणे, बकरी राखणे इत्यादी कामे करावी लागतात. बकरी चरणीच्यावेळी शेतकऱ्यांच्या चाऱ्याचे किंवा पिकांचे नुकसान होणार नाही, अशी काळजी घेणे हे अत्यंत महत्वाचे असते. यात कुचराई करणाऱ्यास बाळूमामा शासन करत असत. कामचुकार, कपटी, खोडसाळांना इथे थारा नसतो. अखाद्य खाऊन व अपेय पिऊन बकऱ्यात येणे चालत नसायचे.
मामा बकरी सवे चालती | बकरी सवे झोपती |
काळापाचीये भोवती | आयुष्य सारे ||
(बाळूमामा वि.ग्र. २५-६२)
ही बाब न विसरता सेवा करणाऱ्यांनी आपले वर्तन ठेवले पाहिजे.
क्रमशः
'बोलाss, बोलाss बाळूमामांच्या नावाने चांगभलं..'
(साक्षीभावातून स्वदृष्टांतान्वये संकलन)
संकलक : सद्गुरुसेवक श्री. भिमाशंकर सिध्दाराम मात्रे
मो.: +91 ९०४९९११०६३
(संदर्भ ग्रंथ : श्री संत सद्गुरु देवावतारी बाळूमामा)
❄❄❄❄❄❄ ❄❄❄❄❄❄ ❄❄❄❄❄❄
'Abhinav Yogi Devavatari Sant!'
Many
extraordinary saints became from different sections of the society. Yallaling
Mahaprabhu of Sant Kanakdas and Mugulkhod of Raibag, Tal. In the village of
Akkol in Chikkodi taluka of Belgaum district of Karnataka, on Monday, Ashwin
Shuddha Vdashi Shake 1918 on October 3, 1892, at 4:23 pm, Lord Shankar himself
accepted his inconceivable love and incarnated as a child in a rich family.
The
rains were over. While she was lying down, the goddess of creation was smiling
wearing a beautiful green shawl. Baliraja's hard work had turned to gold!
Baliraja was eager to worship Bhumata on Navanna Pournima by celebrating
Simolanghan. At that time, Mahatma, who showed the devotional path of
happiness, world and happiness by removing the darkness of sorrow in the lives
of millions of people, appeared!
Mayappa
was a truthful Dhangar and his wife Sundara was very good-natured and devout.
She was a devotee of Vitthal. No one recognized Balumama as an incarnation.
Living in solitude for a long time, resting on the thorns of Babli, enjoying
hours of meditation in the state of Avdai, speaking in sign language, etc., are
incomprehensible to the common man. Only great devotees can recognize great
men.
As a child, Balumama worked at a Shetji's
house. Later, his sister-in-law stayed at work for a few days. While at his
sister's house, his uncle married a girl named Satyavva. By force and
reluctantly accepting the responsibility, Balumama started herding cattle
independently.
'Uncle's
goat service'
Uncle
Dhangari accepted life. There is no end to labor here. This is the maher of the
present day! Sheep and goats are not easy to manage. Wool, rain, cold, wind,
not dry here. Jitrabana water-fodder, there the grass of happiness; Wandering
is your refuge. This is the way of life of uncles! Goats have to deal with many
diseases. That's what I want to say ...
Even
if one falls ill | Mama Hoti Dhanvantari ||
And
Mama cured the goats ||
Goat
grazing | Mama Shamati Udari ||
She
dances on earth Dancing Mama ||
(Balumama VGR 25-60)
Poultry
feed | Mamashi hoy triptata ||
This
was the essence of his life. We have to adapt to fodder scarcity and people of
infinite nature.
If
by mistake a goat eats barley crops Dhani kharpus shivi dei
She
listened intently For the world ||
(Balumama VGR 3-23)
Despite
accepting the extraordinary way of life with zero prestige in the society, the
mind was amazed to see the work done by Balumam to spread policies, devotion,
brotherhood, religion-influence without any appeal to the world.
Mamanchiya
Sevapari | Keep their goat ||
With
this feeling, many devotees come to the herd of goats. At least a quarter of a
month's service is accepted. The chiefs of the flocks of goats will have to do
whatever they are told to do. While serving; Honesty, perseverance, willingness
to do anything. Feeding goats, milking, medicating goats, setting nets for
goats, keeping goats, etc. have to be done. It is very important to take care
that the fodder or crops of the farmers will not be damaged during the goat
grazing. Balumama used to rule over the culprits. There is no shelter for the
deceitful, the deceitful. It was not possible for a goat to eat inedible food
and drink alcohol.
Mama
Bakri Save Chalti | Goat Save Sleeping |
Around
Kalapachiye | All life ||
(Balumama V.G. 25-62)
Those
who serve should not forget this.
Respectively
'Speak, speak in the name of Balumama.
"Good
in the name of Balumama .."
(Compilation of testimonials from
witnesses)
Compiler :
Sadgurusevak
Shri. Bhimashankar Siddharam Matre
Mo .: +919049911063
(Reference: Shri Sant Sadguru Devavatari
Balumama)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा